करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवत
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
            संप्रणाली
 
            माहितीचे मुद्दे
 
            संर्पकासाठी
 
घराण्यांची एकत्र माहिती
घराण्यांतील सर्व व्यक्ती विशिष्ट घराण्यांची सर्व माहिती  
 
  घराण्यांसंबंधी अधिक माहिती वरिल sublinks मध्ये विभागली असुन आपणास, हवी असलेली माहिती पाहण्यासाठी त्यांचा वापर करावा.  
 
घराणी
 

अ)घराणी-
घराण्याचे उल्लेख गावाचे नावाने केले आहे. तसे करणे सोईचे रुढ झालेले आहे्.
आ) घराण्याची क्रमवारी-
आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे असे लक्षात येते की, बहुतांशी करमरकर मंडळीची मुळ गावे पुर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत व त्या गावाची क्रमवारी आद्याक्षराच्या आधारे केली आहे. जेथे शक्य तेथे प्रथम त्या गावाची त्रोटक माहिती देऊन त्या गावी मुंबईहुन अगर पुण्याहुन कसे जाता येईल हे सुचाविले आहे.
इ) वंशावळी व तिची मांडणी-
(१) वंशावळी तयार करण्याबाबतचा तपशील प्रस्तावनेत आलेला आहेच. मुळगाव एकच आहे म्हणजे त्या घराण्याची वंशावळ वास्तविक एकच असावयास पाहिजे पण पारिस्थितीप्रमाणे करमरकर मंडळीच्या मुळगाव सोडुन स्थलांतरे झाली व निरनिराळ्या ठिकाणी वास्तव्ये झाली आणि पुढे एकमेकांशी संबध ही राहिले नाहीत. अशा विविध ठिकाणांहुन मिळालेल्या वंशावळीत ज्ञात मुळ पुरुष भिन्न असल्याने व त्यांचा एकमेकांशी संबध जुळविता न आल्याने त्या स्वंतत्र ठेवुन त्यांना क्रमांक दिले आहेत.
(२) प्राय: डावे व उजवे पृष्ट मिळुन वंशावळीसाठी एक भाग कल्पिला आहे. अशा भागावर प्रथम वंशावळ देऊन लगेच पुढील पानांवर तत्संबंधित व्यक्तींची माहिती दिली आहे.
ज्या वंशावळीत ज्ञात मुळ पुरुष एकच आहे पण वंशावळ विस्तरित क्रमश: भाग करुन वंशावळीचे पानानंतरच्या पानावर वंशावळीच्या पुढील भाग लगेच माहिती असा क्रम वंशावळ संपेपर्यंत ठेवला आहे.
(३) पिढ्यांचे आकडे पानावर आवश्यकता भासल्यास दोन्ही बाजुस दिले असुन त्यांचा क्रम वरुन - खाली असा दिला आहे.
(४) वंशावळीत फ़क्त पुरुष व्यक्तीची कागदोपत्री असलेली नावे दिला आहेत वंशविस्तार ज्ञात मुळपुरुषांपासुन वरुन खाली असा मांडला असुन, पिता पुत्र संबंधदर्शक उभी रेषा जोडली आहे. वंशवृक्षात मुलीची नांवेही माहिती असल्यास दिली जात आहेत.
(५) वंशविस्तार थोड्या जागेत राहुन तो सहज आकलन व्हावा यासाठी काही ठिकाणी बंधुची नावे आडव्या पण रांगेत ओळीने न देता एकाखाली एक दिली असुन अशा दोन नावात उभी रेषा नाही तेव्हा ते एकाच पिढीतील आहेत समजावे. त्यापैकी ज्याचा वंश विस्तार पुढे चालु आहे असे नाव उभ्या क्रमात शेवटी असुन त्याचा पुत्रसंबंध उभ्या रेषेने जोडुन दाखविला आहे.
(६) ज्या व्यक्तीच्या वंशविस्तार पुढे चालु नाही असे कळले आहे अशा नावाखाली आडवी रेषा काढली आहे वा तसेच कोरे सोडुन दिले आहे.
(७) बंधु जेष्ठता क्रमाने असतीलच असे नाही पण जेथे ज्येष्ठता क्रम निश्चित कळले आहेत तेथे जेष्ठतानुसार नावाच्या उजव्या बाजुस अनुक्रमांक दिले आहेत.
(८) व्याक्ती दत्तक आली असल्यास द.आ ही अक्षरे त्या नावापुढे किंवा खाली घातली आहेत.
ई) माहिती देण्याचा क्रम
व्यक्तीच्या माहितीचा क्रम संपादन सामितीचे सदस्य यांनी शोधक विचार करुन जो ठरविला जातो त्याप्रमाणे ठेवला आहे.
माहितीचा तपशील
१) माहिती देताना आरंभी संबधित व्यक्तीच्या पिढीतील क्रम जाड ठशात दिल्यावर त्या व्यक्तीचे नाव, शक्यतो पित्याच्या नावासहीत जाड ठशात दिले आहे.
माहितीत असणा-या सांक्षिप्त अक्षरांचा खुलासा
ज. - जन्म ठिकाण व जन्म तारीख. मृ. - मृत्यु तारीख. शिक्षाणाचे उल्लेख काही वेळा इंग्रजी शब्दांनी केलेले आहेत. वि. - विवाह -तारीख. भ्र. -भ्रतार (पती).
२) नावानंतर जन्मठिकाण- जन्मतारीख-शिक्षण- नंतर व्यक्तीचा जीवनक्रम समजले असा थोडक्यात दिला आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनक्रम विशेष आहे अशांची माहिती थोडी विस्तृत दिली आहे. शेवटी वास्तव्याचा पत्ता पीन कोड सहित दिला आहे.
३) भार्येच्या (पत्न्नीच्या ) माहीतीत- जेथे माहिती उपलब्ध आहे तेथे, प्रथम तिचे सासरचे नाव जाड ठशात दिले असून कंसात माहेरचे नाव दिले आहे. त्यानंतर, जन्म ठिकाण, जन्मतारिख, शिक्षण, विवाह तारीख, व्यवसाय व इतर माहिती असल्यास तपशील देऊन तिच्या पित्याचे नाव व गाव दिले आहे.
४) कन्येच्या माहितीत- कन्या शब्द जाड ठशात दिला आहे. नंतर कन्यांची नावे नेहमीच्या ठशात दिली आहेत. विवाहित कन्येचे प्रथम माहेरचे नाव देऊन कंसात सासरचे नाव दिले नंतर जन्म ठिकाण, जन्मतारीख, शिक्षण, विवाहतारीख, व्यवसाय असल्यास तपशील, पित्याचे घरी न राहता स्वतंत्र राहत असल्यास तपशील पिन कोड सहित पत्ता दिला आहे.
उ) इतर माहिती
१) जन्म, मृत्यु, शिक्षण, व्यवसाय, नोकरी, संबंधाचे काळनिर्देश आकडे इसवी सनाचे आहेत. जेथे शकाचे आकडे असतील तेथे 'शके' असा उल्लेख केला आहे.
२) व्यक्तीच्या नावामागे श्रीयुत, राजमान्य, राजे, श्री, तीर्थरुप, डॉक्टर, चिरंजीव, कुमार, श्रीमती, सौभाग्यवती, गंगाभागीरथी, कुमारी किंवा व्यवसाय मार्गदर्शक उपपदे लावली नाहित, तसेच नावापुढे पंत, रावसाहेबजी इत्यादी उपपदे लावली नाहीत, पण काही ठिकाणी अनवधानाने ती राहिलेली असतील.
३) ज्यांची माहिती प्रयत्न्न करुनही मिळाली नाही किंवा दिली नाही तसा उल्लेख त्या त्या नावापुढे केला आहे.
४) ज्या नावापुढे काहीच उल्लेख नाही त्या व्याक्तीची माहिती कोठेच उपलब्ध झाली नाही असे समजावे.