करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
        संप्रणाली
 
        माहितीचे मुद्दे
 
        संर्पकासाठी
 
करमकरांची कुलदैवते, कुळधर्म इ.- 1  2 3  4  5  6  7           
 

(दासबोध दशक सहा समास चार ओवी वीसावी) मी रचलेली हरिहरेश्वराची आरती खाली उधृत केली आहे.
"कुलदैवत श्री हरिहरेश्वर"
जयदेव जयदेव हरिहरेश्वर देवा
पंचारती ओवाळुन करितो तव सेवा ॥ जयदेव जयदेव ॥
रायगड जिल्ह्यातील, हरेश्वर ग्रामी
वास्तवाने झाली पावन ती भुमी ॥
अगस्ती महामुनी हस्ते झाली तव स्थापना
याची नोंद आहे इतिहासी जाणा ॥
ब्रम्हा, विष्णू, महेश, पार्वती लिंगरुपे वसती
ऎशी पसरली आहे सर्वत्र ख्याती ॥
पितृ श्राध्दादी कर्म विष्णुपदी होती ॥
राम प्रभुने करुंनी दावियली प्राचिती॥
अगाध माहिमा तुमचा वर्णावा तो किती
दर्शन घेऊनि गेले समर्थ -छत्रपती ॥
करमरकर कुलिनांचे "कुलदैवत " तुम्ही
याची जाणीव ठेवु सदैव मनी, आम्ही
करमरकर बंधु भागिनी आणि बाला
भक्ती भावे वाहति सुमनांच्या माला॥
वाहुनि आपुल्या चरणी कुसुमाची अंजली
मने आम्हा सर्वांची आनंदी जाहली॥
कृतार्थ होण्या आम्हा आशिवचना
जोडुनी कर विनवितो ‘वसन्त‘ तव चरणा॥
करमरकरांनी कुलस्वामिनी "केळाई दैवी" या दैवीचे गोव्यात महापशाजवळ आहे.डिचोली गावाच्या पुर्वस मये गावाच्या सीमेत हे स्थान आहे डिचोली पासुन मये हे गांव पाच ते सहा किलोमीटर अतंरावर आहे. डिचोली - मये हा वीस पंचवीस मिनीटांचा प्रवास आहे. देवालय छोटेसेच असुन दैवाची मुर्ती काळ्या पाषाणाची कोरीव तेजस्वी आहे. दैवी मांडी घालुन बसलेली असुन तिचे दोन्ही बाजुंना कलश घेतलेले हत्ती उभे आहेत. देवळाच्या दारावर (श्री केळबाय प्रसनोस्तु") अशी अक्षरे लिहिलेली आहेत केलिंबिका, केळाई व त्याचेच केळबाय अशी रुपे झाली.हे दैवालय शके १५०९ मध्ये बांधले असल्याचा उल्लेख आहे.केळाई व पार्वतीचा (लक्ष्मीचा) अवतार मानतात. या देवीचा वार्षिक उत्सव चैत्र प्रातिपदेचा आठव्या दिवशी(चैत्र शुध्द अष्टमी)साजरा होतो. डिचोलीला म्हापशांवरुन जाता येतो. एसटी ची सोय आहे डिचोली बस थांबावरुन उतरुन रिक्षाने देवालयापर्यंत जाता येते. रस्ता चढावयाचा असला तरी चांगला आहे. बहुतेक कोकणस्थांच्या कुलस्वामिनीची स्थाने कोकणात किंवा देशावर आहेत पण करमरकरांची ही देवी मात्र गोव्यात आहे कारण ज्या करमरीच्या झाडावरुन करमरकर हे आडनांव पडले त्याच झाडाजवळ हे देवीचे स्थान असुन करमरकरांनी तिला आपली देवी मानली पुर्वी हा प्रदेश महाराष्ट्रात होता करमरकराशिवांय केळकर व फ़डके या आडनावांच्या कोकणस्थांची केळाई हीच कुलस्वामिनी असल्याचे ऎकीवात आहे.
विस्मयाची गोष्ट म्हणजे जरी बहुतेक करमरकर कुटुंबियांना केळाई हीच आपली कुलस्वामिनी असल्याचे माहिती होते तरी तिचे स्थान कोठे आहे याची कल्पना नव्हती. त्यामुळे त्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला कोणी ही जाऊन आलेल नव्हते बराच शोध घेतल्यावर गोव्यात मये या गावी देवीचे स्थान आहे ही माहीती आम्हाला मिळाली व आम्ही तिचे दर्शनाला जाऊन आलो. कुलवृत्तांत लिहिण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्याच्यापैकी काही जण या देवीच्या स्थानाच्या शोध घेउन आले व मये येथे असणारी केळाई हीच करमरकरांची कुलस्वामिनी आहे असा निर्वाळा मिळाला देवीनेही तसा कौल दिला.या देवीचे पुजारी वझे आडनावांचे असुन ते मये येथे राहतात या देवीची आरती मी रचली असुन ती येथे उद्यृत केली आहे.
श्री देवी "केळाई" मातेची आरती (केलांबिका देवी)
जयदेवी जयदेवी देवीकेळाई
नामस्मरणे तुमच्या संकट दुर होई ॥ जयदेवी ॥
मये निवासी देवी रक्षी आम्हासी
करमरकर कुलोत्पत्री लहान थोरासी॥ जयदेवी॥
सुखकारी दु:खकारी लावण्यासारखी
मुर्ती तुझी देखोनि गेलो हरकुनी ॥जयदेवी॥
कोण कुलस्वामिनी पडली आशि भ्रांत
कौल देऊन केले तुम्ही निर्भात॥जयदेवी॥
भक्तीभाव आम्ही आळवितो तुजला
उणे पडु दे काही कोणा आम्हाला ॥जयदेवी॥
कृपा प्रसादे आम्हा रक्षी तु जननी
जोडुनि कर विनवितो "वसन्त" तवचरणी॥जयदेवी॥

मागे पुढे
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+